Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

शब्दाशिर्वाद...

शब्दाशिर्वाद...

1 min
129


मला मिळावी शब्दाशिर्वावादाच्या ओळी ...

मर्म ही मर्मबांधी तुझ्याशी ,

व्याकुळता मनी कशी ,

खुलत नाही अंतरी ती जशी ,

अप्रतिम असावी शब्दांची काशी ...

अब्रु तुझ्याशी जुळलेली ,

नाही ढोलताशांचा गजर तरी पुरलेली ,

सल सलते ती अशी ,

जिव्हारी धुमसून जळली शब्दांची वेशी ...

ये ना गं समोरी रूप पारदर्शी घेऊनी ,

तळपती मनाची दरी विव्हळुनी ,

अमृत शर्करा तू जीवनातली ,

सजली कागदावरी परी शब्दांची काव्यांजली ...

कष्टाची पराकाष्ठा कराया तैयार सखे ,

तु शोभावी भाळी ही काळजी ,

लखलखती तारकां मनी ये ना उतरूनी ,

आतुर मनगटी वसलेली नाजूक तर्जनी ,

टाहो फोडत आहे शब्दांची रागीणी ...

अपराधी वाटे मला गं ,

जर न मिळाला न्याय तुजला तुझ्यापरी ,

अवेळी मला सतावतील भाव सुकुमारी ,

साजूक तुपात तु भिजलेली शब्दकळी ,

हव्यास ला मिळावी शब्दाशिर्वावादाच्या ओळी ...


Rate this content
Log in