STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

शब्दांचा कहर

शब्दांचा कहर

1 min
498

कविता लिहण्याआधी

विचारांचा मनात कहर

कल्पनेच्या झाडाला

येते शब्दांचा बहर


भावनांच्या सागराला

येते मनात उधाण

विचारांच्या दरीत

मन होत बेभान


लाटांसारखे शब्द 

रोज भेट घेतात

जाता जाता लाटा

काव्य सुचवून जातात


सभोवताली झाडे

डोळ्यांसमोर डोलती

सांगती आवाज मनाचे

शब्दांमधूनी बोलती


शब्दफुले पाहून

माझ्यावर हसतात

नाही केले काव्य

ते मजवर रुसतात


घ्यावया जाऊन भेट

त्यांच्याजवळ पोहचते

लिखाणाने होतात खुश

त्यांना मग मी वेचते


Rate this content
Log in