शब्दाची ताकद
शब्दाची ताकद
1 min
11.8K
शब्दांचे धारदार हत्यार असे
जपण्यास सामर्थ्य लेखणीचे
अविचारांचे विकृतकारी वारे
बदलण्यास विचारसरणीचे...
शाब्दिक कृतीतून घडे क्रांती
मिटवण्यास भय मूळ विषमतेचे
वाईट प्रवृत्तींवर मात करण्यास
विश्वासू सुराज्य हाती समतेचे...
मौल्यवान सुसंस्कारी प्रतिभेस
साहित्य कलागुणांचा हातभार
माणुसकी हृदयी जागवण्यास
शब्द सुमने गाजवी पुढाकार...
व्यक्तिमत्व साकारण्यास तत्पर
फेडण्यास ऋण प्रगत दौलतीचे
शाईची ताकद शास्त्र रुजवते
ज्ञानाचे धडे खऱ्या संस्कृतीचे...