शब्दाचार...
शब्दाचार...
1 min
257
विचार शब्द थोर साथी सोबती
सोन्यासारख्या माणसांचे जपते मन
अपशब्दांचा गोंधळ फक्त मानात नाही
विश्वासाचं देणं थाटामाटाने उभे मनी
द्वेषाचा घाट कधी मोठ्या धाटणीचा
मनोमनी प्रेमळ आदरभाव मात्र सजलेला
वाईटाचा व्हावा बिमोड कायमचा सर्वनाश
चांगल्याला मिळावी खरी प्रकाशवाट
जीवनाची करुनी प्रेमळ उज्ज्वल शान
शब्दाचार बहुमान जागवता अभिमान
