शब्द
शब्द
1 min
26
शब्द भान शब्द जाण
शब्दांनीच मानापमान
शब्द शास्त्र शब्द शस्त्र
कट्यारीसम दुधारी अस्त्र
शब्द भाव शब्द घाव
शब्दची घेई हृदयिचा ठाव
शब्द भाषा शब्द संवाद
शब्दामूळेच होतो वाद
शब्द कटू शब्द गोड
शब्दाला हवी माणुसकीची जोड
शाब्दानेच वाढे शब्द
मौनातही शब्द नी:शब्द
शब्दानेच घडले रामायण
शब्द घडवी महाभारत
पुराणातील घेवून धडा
शब्द वापर जपून जरा.