STORYMIRROR

Gajanan Pote

Others

3  

Gajanan Pote

Others

शब्द

शब्द

1 min
223

शब्द तारी शब्द मारी 

शब्दांची किमया न्यारी।। 

शब्द जोडी शब्द तोडी

नाती ही सारी

शब्द आवरी शब्द सावरी।। 

शब्दांचा नको पसारा

उच्चारतांना जीभ आवरा।। 

शब्द उगवती सूड,

शब्द असे प्रेमाचे मुळ

शब्दांची नको पडझड, 

शब्दानेच मिळते बळ।। 

शब्दांचा हा खेळ सारा, 

शब्दांचा हवा सहारा

शब्दांत हवा गंध प्यारा, 

नका देवू द्वेष भावनेला थारा।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन