शब्द
शब्द
1 min
154
शब्द जाता गोठून
मन आले दाटून
शब्दात शब्द शोधून
स्वतःला गेले विसरून
शब्दाने मनाला शोधले
पुन्हा मी जगात आले
मोह माया तोडून पाहिले
प्रीतीलाही आवर घातले
ध्येय आपुले माझे बरे
करीन साध्य हेच खरे
शब्दसखा हा माझा रे
शब्दाने स्वतःला सावरे
शब्दामुळे मी आहे
शब्द माझे सोबती
साहित्य माझे वाढे
सख्यास मान देती
