शब्द संपत्ती
शब्द संपत्ती
1 min
471
लिहीत गेलो जे मनात आले
कागदावर शब्द उमटत गेलो
भावनांना केली वाट मोकळी
शब्दांत ओळीने बांधत गेलो
परिसराच्या निरीक्षणातून
निसर्गाकडे बघत गेलो
डोळ्याने जे जे पाहिले
ते अक्षरांतून मांडत गेलो
दृष्टी बदलली सृष्टी बदलली
तसा मी पण बदलून गेलो
प्रत्येक गोष्टीवर चिंतन करत
एक एक माणूस जोडत गेलो
मी होतो एक साधा माणूस
आज नासा कवी बनलो
शब्दाने दिली खूप संपत्ती
हेच साऱ्यांना सांगत गेलो
