शब्द म्हणजे मीच...
शब्द म्हणजे मीच...
1 min
296
शब्दात होते मन मोकळे
शब्दात होतो संवाद खुळा
शब्दात विश्वास मोठा
भावनांचा जुळतो सूर सारा...
शब्दात रचते सुरेख काव्य
शब्दात झुलते निखळ हास्य
प्रीत माझे फुलते मोहात
शब्दांच्या प्रेमळ झुल्यावर...
शब्दाचा माझ्यात निवास
विचार मांडणं माझा श्वास
समजणं मला शब्दात सोपं
शब्द म्हणजे मीच तयात...
