STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Others

4  

Kamlesh Sonkusale

Others

शब्द अंतरीचे

शब्द अंतरीचे

1 min
28.1K


हातात घालुनी हात

संगती तुझ्या प्रवास,

पैलतीरी शब्दांच्या त्या

सोबत तूच हवास.


भावना त्या अंतरीच्या

कळेना आता फुलास,

दरवळणारा गंध

मातीचा असे सुवास.


बेभान होऊन वारा

झोंबतो तन मनास,

व्याकुळलेला गारवा

घालतो साद प्रेमास.


घालता फुंकर वारा

वेडावूनी त्या मनास,

मिठीत घ्यावे तुजला

हृदयातल्या सुखास.


जीवन वाट अपुली

सुखद हा सहवास,

शब्द तुझे अंतरीचे

कळावे सदा मनास.


साहित्याला गुण द्या
लॉग इन