शब्द अलंकार
शब्द अलंकार
1 min
205
क्षण ओथंबती जणु रेती
मनी विसावली भावप्रिती
ओघ मायेचा आसु गाळती
भार मनीचा शब्द वाहती
मन भावनांचा कुंचला
शब्द हा तयाचा सखा
पानोपानी मी गुंफला
शब्द तो अलंकार जसा
नक्षी कोरली भावनांची
भाव गुंफले ते मनीचे
कवितेत लिहिलेल्या ओळी
भावरूप मोती कवितेची
अक्षरांस पुसला जो कधी
शब्दांचा तो अर्थ खरा
कवितेत कसा गवसला
जीवनाचा भाव तो सारा
साज श्रृंगार हा कवितेचा
शब्द भाव अर्थ गोवला
शब्दअलंकार लेऊनि
काव्यात भाव शोभिला
गुंफता माळ शब्दांची
मोतियांचं लेणं व्हावी
शब्द सोनेरी लेऊनि
कविता ही सिद्ध व्हावी
