शौर्य साहस
शौर्य साहस
1 min
196
साहस करते मूल ,प्रथम चढते शाळेची पायरी.
अन काबीज करते एक एक क्षेत्र
,स्व कर्तृत्वाने बुद्धीने सराव व स्व कष्टाने.
नवी नवेली नवरी प्रथम टाकते पाउल सासरी.
हे ही एक सर्वोच्च साहसच महान. अन मग
आपल्या गोड वाणीने ती सर्वांचे काळीज
जिंकते, होते महाराणी घरच्या सदस्यांची.
मानव जेंव्हा जीवन यात्रेत चालत असतो
वाटे त्याला आहेत सगे सोयरे संगतीला
येता अनुभव एकटेपणाचे शौर्यच समजावे ते
जीवन कंठण्याचे .
असे साहस दिसे ,प्रसंग भिन्न व्यक्ती भिन्न.
पण कष्टाला नाही सीमा , ती ओलांडून पुढे पुढे
जात राहावे सर्वाना सहकार्य करावे
जगात साहस रुपी नाव व्हावे
