STORYMIRROR

Sangita Pawar

Others

4  

Sangita Pawar

Others

शारदीय पौर्णिमा--

शारदीय पौर्णिमा--

1 min
486

चंद्रमा शारदीय पौर्णिमेचा

चंदेरी शितल चांदण्यांची

साक्ष ठेवी असे कोजागरती

निशा अश्विनी पौर्णिमेची ||


प्रकाशातून दिसे चंद्रमा

महत्व असे किरणांचे

सुगंध दरवळे रातराणीचा

मनमोहन चांदणे नक्षत्राचे ||


 कोजागिरी बरसे अंगणी

शुभ्र चंदेरी लखलखाटी

अबोली अशी रात्र धुंदवेडी

प्रीतभावनांचा गंध वाटी ||


दुग्धशर्करा मनोमिलनाचे

आदर्श भावना परंपरेचा

पाहुनिया प्रतिबिंब तयाचे

दुग्धप्राशन मंत्र आरोग्याचा ||


सौख्य नांदेजीवना आज असे

कोजागिरी सोहळा पुण्यवान

तनु-मन रमती चंद्रमा स्मृतीत

सारी सृष्टी होते प्रकाशमान ||


 जागर शीतल चांदण्यात

गरबा करू देवी आगमना

 चंद्रमा खुलला आसमंती

मुखचंद्रमा करू वंदना ||


Rate this content
Log in