STORYMIRROR

Harshada Pimpale

Others

4  

Harshada Pimpale

Others

शांतता तुझी नको वाटते....

शांतता तुझी नको वाटते....

1 min
24

अंतरीच्या शब्दांना साथ तुझी

हवीहवीशी वाटते, पण

अंतरीच्या वेदनांना मात्र 

शांतता तुझी नको वाटते...

ओल्या जखमांवर तुझी

हळुवार फुंकर हवीहवीशी वाटते, पण

भाळलेल्या या जखमांना मात्र

शांतता तुझी नको वाटते...

अंतरीच्या भावनांना साद तुझी

हवीहवीशी वाटते, पण

स्पर्श-ओल्या या भावनांना मात्र

शांतता तुझी नको वाटते...

अंतरीच्या सुरांना लय तुझी

हवीहवीशी वाटते, पण

वाट चुकल्या या सुरांना मात्र

शांतता तुझी नको वाटते....

अंतरीच्या या प्रेमकळीला तुझी

फुलणारी पाकळी हवीहवीशी वाटते, पण

फुलणाऱ्या त्या प्रेमकळीला मात्र

शांतता तुझी नको वाट्ते...

अंतरीच्या या अंतराला सोबत तुझी

हवीहवीशी वाटते, पण

अंतरीच्या दुरावलेल्या अंतराला मात्र

शांतता तुझी नको वाटते...

म्हणून अंतराला या माझ्या 

शांतता तुझी नको वाटते,

तू न थकता, न थांबता 

हळुवारपणेआनंदी बोलावे,  

इतुकेसे हे या वेडया अंतरा वाट्ते... 

पण

शांतता तुझी नको वाटते...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन