शांतता जाणवे मला जेव्हा
शांतता जाणवे मला जेव्हा
शांतता जाणवे मला जेव्हा
भास होतो मला सदा
जाणवे ती असे शांतता
अंधारात फिरताना जाणवतो जो भास
ती असते निरामय शांतता
रस्त्यातून जाताना भान नसते घडतो अपघात
मग जाणवते ती दवाखान्यातील शांतता
कुणास ठाऊक, कसे सांगू, कसे दाखवू ,
कुठे हरवली ही माझी शांतता
शांतता हे जाणवते जेव्हा
मनी वसे हे विद्रूप विचार जेव्हा
शांतता हे जाणवतं हृदयाला जेव्हा
परोपकार जेव्हा करी माझे मन जेव्हा
शांतता ही जाणीव जेव्हा
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहून आनंद सदा
शांतताही जाणावे जेव्हा
प्रेम करते माझी माया सदा
शांतता ही जाणीव जेव्हा
पहाटे किलबिल पक्षांची कानी पडेल तेव्हा
शांतता ही जाणावे जेव्हा
उन्हाळ्यात प्राणी पक्षी पाणी पितो तेव्हा
