STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

शांत राहणे

शांत राहणे

1 min
324

म्हणून शांत राहणे चांगले,

 मन तोडण्यासाठी,

शब्दांना असते धार, 

त्या धारेने मग होतात,

कधी न पुसणारे वार,

      म्हणून शांत राहणे.....

बोलणारा आपले शब्द,

सहजच विसरून जातो,

ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात,

 त्या शब्दाचे घर बांधून बसतो.

        म्हणून शांत राहणे.....

आपले हजारो योग्य शब्द,

दुर्लक्षित केले जातात,

 पण एक अयोग्य शब्द,

कोरुन मात्र ठेवतात.

         म्हणून शांत राहणे..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन