STORYMIRROR

Mrudula Raje

Others

2  

Mrudula Raje

Others

शाम सखा

शाम सखा

1 min
225

शाम सखा आला, माझा शाम सखा आला।

वनावनातून, चराचरातून, आनंदघोष झाला।

माझा शाम सखा आला॥


हिरवी राने, हिरवी पाने; नटली- सजली आनंदाने।

कृष्णसख्याच्या स्वागतास्तव, वसुधेने शृंगारसाज केला।

माझा शाम सखा आला॥


वृंदावनीचा रास रंगला, आनंदाचा रंग उधळला।

टिपऱ्या - वेणू, जुगलबंदीचा खेळ पहा रंगला।

माझा शाम सखा आला॥


कोठे माधव, कोठे राधा, गोप-गोपिका कुठे हरवल्या।

यमुनातीरी, वृंदावनी, त्या शामरंगी रंगल्या।

माझा शाम सखा आला॥


श्रावण घननीळ बरसला, प्रीतीचा मधुमास रंगला।

स्वर्गामधुनी देवेंद्राने भूवर पुष्पवर्षाव केला।

माझा शाम सखा आला, माझा शाम सखा आला॥


Rate this content
Log in