STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

शालेय जीवन

शालेय जीवन

1 min
507

शालेय जीवन, रम्य स्मृती

नित्य नाविन्यपूर्ण प्रसंग

मित्रमैत्रिणी नि दंगामस्ती!

लपूनछपून डबा खाणं,

वेणी ओढ, उठाठेव नस्ती!!


मधल्या सुट्टीचं काय सांगू

खेळ बागेत, ताेडून फुले

मित्रमैत्रिणींची काढा खोड

गुच्छ, हार, वेण्या बाईंसाठी

गुरुंवरचे प्रेम अजोड!!


राग, रूसवे क्षणापुरते

भरते येई पुन्हा प्रेमाचे

मैत्रीचा सुंगंध दरवळे!

संस्कार, शिस्त ती गुणवत्ता

मिळाली आज मधुर फळे!!


Rate this content
Log in