शाळेत नेते धरून सोंडेला
शाळेत नेते धरून सोंडेला
1 min
422
माणसाची असो वा प्राण्याची
असते ती माय
जपते आपल्या बाळाला
जशी दुधावरली साय
पहिला गुरु तीच असते
श्री गणेशा गिरवून घेते
बोटाला वा सोंडेला धरुन
जगण्याचे ती धडे शिकविते
हाताला धरून ओढत आई
जशी नेते शाळेला
तशीच हत्तीण पिल्लाला
शाळेत नेते धरून सोंडेला
सौ ज्योती दीपक गोसावी/दुसंगे
ठाणे
