STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

3  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

शाळेचे दिवस

शाळेचे दिवस

1 min
238

तेव्हा शाळा शिकताना,

फारच मजा यायची.।

हसत खेळत शेवटीला,

फक्त वेळच निभवायची॥


कुणी दिवस ढकलायची, 

कुणी अभ्यास करायची।

काही फक्त मार खायची,

बाकीचे मज्जा पहायची ॥


कुणी गाणी म्हणायची,

कुणी सोंगं अणायची।

काही डोकं चालवायची,

काही वेळ टोलवायची ॥


असायचे रात्रीचे ते तास,

लाईट जायची हमखास।

पर्याय मेनबत्तीचा खास,

पण खोडकरांचा सहवास॥


कुणी कुणी करायचे खोडी,

मोजक्यांची सरांशी गोडी।

कुणी सरांना पुरवणारे छडी,

काहींचे छडीसाठी हात पुढी॥


तेव्हांचा आजला मनस्ताप,

कुणा वरदान कुणास शाप ।

कर्तव्यदक्ष पालक मायबाप,

स्वभानुसार प्रगतीचा ग्राफ॥


Rate this content
Log in