शाळेचा पहिला दिवस
शाळेचा पहिला दिवस
1 min
132
आठवतो मला
माझ्या शाळेचा
पहिला एक दिवस
खूप छान नसला
तरी छान होता तो दिवस
पहिलीत होती मी
नवा वर्ग होता
नव्या बाई आमच्या
अभ्यास सुरू होता
बालवाडीतील खेळ
मी मनात आठवत होते
आता मात्र अभ्यास मला
मुळीच आठवत नव्हते
जवळ येऊन माझ्या
बाईनी पाढे विचारले मला
एक ते दहा अंक बोलून झाले
पुढे बोलताच आले नाही मला
पाहून मी छडी
घाबरून मान खाली केली
उगाच मी घाबरली
बाईंनी मार दिला नाही
जवळ बाईंनी घेतलं
शाळा सुटण्याची घंटा झाली
छान होत्या आमच्या बाई
थोडी माझीच फजिती झाली ..
