Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

शाळा बंद पडल्या तर...

शाळा बंद पडल्या तर...

1 min
23.1K


शाळा बंद पडल्या तर लहान मुलांचं 

शिक्षणाशिवाय काय भविष्य असणार 

मौजमजेतल्या अभ्यासाविना त्यांना 

इंटरनेटवरचं उपाशी आयुष्य भेटणार... 


शाळा बंद पडल्या तर आपण सर्व 

जणू अडाणीपणातलं जीवन जगणार 

अंधश्रद्धेचं खायला उठेलेलं हे जग 

ज्यात नैतिकतेचं भानच मुळी नसणार... 


शाळा बंद पडल्या तर विद्यार्थी 

शाळेचा शैक्षणिक अनुभव कसे घेणार

आता ऑनलाईन तंत्रज्ञानाशी त्यांचा 

मेळ बसण्यास खरंच वाव मिळणार...


शाळा बंद पडल्या तर ज्ञानाच्या 

कक्षा गुरुविना कशा रुंदावणार 

शिक्षक जीवन मूल्ये सांगणारा 

गुरु म्हणून शिष्य कसा घडवणार... 


शाळा बंद पडल्या तर मानव 

प्रगतीचा मार्ग कसा गाठणार 

उद्योग, व्यवसायासारख्या क्षेत्रात 

शेवटी समाज अज्ञानीच राहणार... 


शाळा बंद पडल्या तर असंस्कारी 

समाजाची रचना कशी बदलणार

फायदा, नुकसान, विज्ञान नि 

अज्ञान वैचारिक कसे बरे होणार... 


शाळा बंद पडल्या तर शैक्षणिक   

पैशांचा बाजार कसा थांबवणार 

तंत्रज्ञानाचा उपयोग विकासशील 

पद्धतीतून खरंच साध्य करणार... 


शाळा बंद पडल्या तर करोडो लोक 

देशाचे सुजाण नागरिक कसे बनणार

माणुसकी, संवेदनशीलता, नियम 

सगळेच बासनात गुंडाळले जाणार...


शाळा बंद पडल्या तर निरक्षरता 

माणसात अराजकता फैलावणार 

सहकार्य, आदरभाव या गुणांचे 

मुलांमध्ये मूल्यांकन कोण करणार... 


शाळा बंद पडल्या तर भकासतेच्या 

वातावरणात मुलं एकाकी पडणार 

अनेकविध कलागुणांच्या संपन्न 

नौकेत विराजमान कसे होणार... 


शाळा बंद पडल्या तर भावनांची

उघड गुलामी वाट्याला येणार 

प्रेम, निरागसता, आदर, सन्मान 

यांची स्वायत्तता हिरावली जाणार...


शाळा बंद पडल्या तर पालकांची 

सततची घालमेल होत राहणार

मुलांच्या उज्वल भवितव्याची 

एक वेगळीच चिंता सतावणार... 


शाळा बंद पडल्या तर मैत्री नाते 

कोवळ्या वयातले कसे फुलणार

अनोळखीत आपलेपणाचा भाव 

विद्येविना कसा योग्य पारखणार...


शाळा बंद पडल्या तर उगाच भर 

बेशिस्त समाजकंटकांची होणार 

नसता सामाजिक बांधिलकीचे भान 

व्यक्तिमत्व विकास कसा साधणार... 


शाळा बंद पडल्या तर मुलांचा 

उपद्रवी त्रास कुटुंब रोजच भोगणार

घरात आरामात, शिस्त मोडून 

भांडणांचा उपहास करत बसणार... 


शाळा बंद पडल्या तर मुलाच्या प्रगती

पुस्तकाविना शाबासकीला अर्थ नसणार 

खडू, फळा, लळा नि जिव्हाळा यांत 

न रमता शिकण्यात काय मजा उरणार... 


शाळा बंद पडल्या तर गरीबाची मुलं 

प्रगत शिक्षणाचे धडे कसे गिरवणार 

विद्येचे हे माहेरघर चार भिंतींविना 

अंती अपूर्णच का हो आता राहणार...


Rate this content
Log in