शाळा आणि पहिला पाऊस!
शाळा आणि पहिला पाऊस!
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही
सोबतच सुरू व्हायचे.
पहिल्या पावसासोबत शाळेच्या मनात साठलेल्या अनेक आठवणी आहेत
पावसात जणू बालमन ते कल्पतरू बनायचे.
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!
शिक्षक वर्गात सर्वांना शिकवत असायचे.
एकाही विद्यार्थ्याचे चित्त तिकडे नसायचे.
बाहेर बरसणाऱ्या पहिल्या
पावसाकडे लक्ष साऱ्यांचे असायचे
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!
खिडकीतून दिसणारे निसर्ग सौंदर्य
पक्ष्यांच्या किलबिलाट,मातीचा सुगंध
खिडकीतून येणारा थंडगार वारा
आपल्या सोबत घेऊन यायचा पावसाची सर
शाळेचे वातावरण मन प्रसन्न करणारे असायचे.
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!
पाऊस मोठा खट्याळ,
कधीही चुकवली नाही
त्याने आमची शाळा सुटण्याची वेळ
पावसात भिजण्याचे मग निमित्त व्हायचे.
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!
शाळा सुटल्यावर रस्त्याच्या कडेने
पायी चालत येण्याचा शिरस्ता असायचा
वाटेवरुन जातांना मध्ये दोन तळे लागायचे
पावसाच्या पाण्याने ते तुडुंब भरून वहायचे.
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!
कागदाच्या होडी बनवून त्या तळ्यात टाकायचे.
जरा जोरात बरसायला लागला की छत्री दप्तरात ठेवून
मुद्दामच ओले होऊन घरी जायचे.
आमच्या लहानपणी नेहमीच असे व्हायचे
शाळा आणि पहिला पाऊस दोघेही सोबतच सुरू व्हायचे!!