शाळा आणि माय
शाळा आणि माय
1 min
11.6K
बालपणी शाळेत ये-जा खूप झाली
अन् शाळेला मी कधीच विसरलो नाही
मनाच्या कोपऱ्यात आहे ती बसुन
अन् आस्थेने कधी विसावली नाही
शाळेकडून घराकडे पडता
पाऊले व्हायची हलकी
दप्तरही सोपे वाटायचे
हे कधी कळलेच नाही
खरं म्हणजे
वर्गापेक्षा मैदानावर
जास्त मन रमायचं
लंबी घंटा होताच घराकडे पडायचं
घरी येऊन दप्तर फेकुन
मायेच्या कुशीत घुसायचं
अन् शाळेतील सारे शिकवेगीले
येऊन माये जवळ सांगायचं
बदाड मार खाऊनही
माय पासुन मन दुर झालं नाही
मोकळं व्हायला तिच्या कुशी इतकी
दुसरी विश्वासाची जागा भेटली नाही