शाब्दिक आत्मवृत्त...
शाब्दिक आत्मवृत्त...
1 min
315
कवितादिनानिम्मित आज वर्णू तिचे महत्व
शब्दांच्या रूपातून करू तिचा आदर...
जीवनाचे सांगण्यास माहात्म्य ती माध्यम
अशा कवितेचे आत्मवृत्त करू उजागर...
लेखणीस ममतेच्या मायेने कुरवाळत असता
कवितेच्या गावात मी माझ्यात असते धुंद...
शब्दांची ताकद तिच्या नावात एकवटते
गीत तिच्या लयबद्धतेचे करते बेधुंद...
शब्दांचे सौंदर्य करते नखशिखांत मोहित
कवितेत दडते माझे हळवे, दिव्य अस्तित्व...
कैफियत ऐकण्यास माझे सदैव तत्पर
हेच आहे जीवनाचे माझ्या मार्मिक सत्व...
