Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MAHENDRA SONEWANE

Others

4  

MAHENDRA SONEWANE

Others

सेवा डॉक्टरची

सेवा डॉक्टरची

1 min
23.9K


रुग्ण सेवा हेच तुमच्या जीवनाचे तत्व आहे, 

म्हणून डाॅक्टरांचे एक महान व्यक्तिमत्व आहे||

तुमचे समाजासाठी एक चांगले ध्येय आहे, 

तुमचे जीवन मानवतेच्या सेवेत सदैव तत्पर आहे ||


रुग्णाला प्रत्येक दुर्धर आजारापासून वाचवता तुम्ही, 

रुग्णासाठी स्वतःची झोप मोड करता तुम्ही |

नाही पाळत कधी जेवणाची वेळ तुम्ही, 

सदा तयार असता रुग्णांच्या सेवेत तुम्ही ||


आजच्या घडीला अहोरात्र सेवा देतात, 

तरीही मूर्ख लोकं डॉक्टरवर हल्ले करतात |

लोकांच्या भल्यासाठी ते इलाज करतात, 

पण लोकचं डॉक्टरच्या मनाला दुखावतात ||


समजा डॉक्टर आपली जबाबदारी झटकतील, 

तेव्हा लोकं रुग्णांना घेऊन दारोदार फिरतील |

जिवाची पर्वा न करता डॉक्टर सेवा देतात, 

आपल्या आरोग्याची निगा तेच राखतात ||


डॉक्टर आणि देव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, 

त्यांच्याकडे रूग्णाप्रति असणारी भावना आहे |

 आपला रुग्ण कसा बरा होईल याची त्यांना धडपड आहे, 

त्यांना त्यांच्या कर्तव्य आणि आचरणाची जाणीव आहे ||


Rate this content
Log in