सध्यातरी
सध्यातरी
1 min
191
पुढचे सांगू शकत नाही विचार नाही सध्यातरी
पाऊल एक घेतले मागे माघार नाही सध्यातरी
विरोध झाला पाहूनी केली मग्रुरी नाही सध्यातरी
बाधक जेथे साधतो मौन बोलत नाही सध्यातरी
अजेंडा जुना राबवू आम्ही शक्यता नाही सध्यातरी
वर्चस्व जरी आमचे हात लावत नाही सध्यातरी
शब्दांचे खेळ खेळतो नेता पाळत नाही सध्यातरी
स्लीपर सेल आमचे दक्ष सक्रिय नाही सध्यातरी
आदेश दिले संघटनांना दंगल नाही सध्यातरी
विचका झाला मनसुब्यांचा उल्लेख नाही सध्यातरी
