सौंदर्याची खाण
सौंदर्याची खाण
"प्रिये" तुझे "सौंदर्य" पाहता
लाजल्या स्वर्गातील "अप्सरा"
रूप पाहता "आरस्पानी"
वितळून गेला "पारा"
"हास्य" खुलवी गालावरची "लाली"
पाहून कोमेजली "गुलाबाची कळी"
पाहून केस "सुकेशिनीचे"
झोपली आकाशी "रातकळी"
दावी "पंकज" नयनी "चमक"
"दिनकर....सुधाकराची" झलक
बाग "फुलांची" केसात माळली
उघडे ना "चांदण्यांची" पलक
अंगणातील. "दवबिंदूच्या"
इर्षेत कोसळती "जलधारा"
भिजली तुझी "मादक काया"
झोंबतो अंगी "यौवन वारा"
तुझ्या "दंतपंगती" जणू
भासती चमचमत्या "चांदण्या"
"कृष्णरंगात" शोभती तुझ्या
त्या "तारका" देखण्या"
"स्वर" तुझा ऐकता
मुकी झाली "कोकीळ"
पाहून "तेजस्वी" कांती
थांबे "भास्कराची" शीळ
आरस्पानी....(.अर्थ)...स्त्रीच्या सौंदर्याबाबत वापरले जाणारे विशेषण.... संगमरवरी सौंदर्य.... आरस्पानी सौंदर्य हे...महाराणी पद्मिनी साठी "राजवर्खी" या अर्थाने वापरले गेले आहे....