STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सौंदर्य....

सौंदर्य....

1 min
206

खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य 

महत्वाचं वाटतं अनेकांना 

नि भुरळही घालतं अनेकदा....

ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात 

पण मनात कुठेतरी दडलेलं असतं... 

कधी आपल्याला कोणाच्या 

वागण्या-बोलण्यातून जाणवतं

तर कधी आपल्याच विचारांतून...

मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं.... 

मनाचं जे हृदयाला साद घालतं ते 

की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....

आता कसं बरं ठरवणार...?


Rate this content
Log in