सौख्याचे प्रेम निधान"
सौख्याचे प्रेम निधान"
1 min
71
फुलात दिसतो मनी विहरतो
प्रकृतीने रचना केली छान
क्षणभंगूर जीव उगाच फसतो
जगताना मधेच सोडतो प्राण...
उगाच जीवाला का तू छळतो
अजुनही समजूनी घे विधान
तळमळतो परी निर्जीवासम
कंठतो दारून दु:ख परीनाम...
उधाणलेले आयुष्य जगूनी
हिरवळ तू अंजानपणे खूडतो
वाहून निश्चल रेती मातीसम
लाटेसोबत वाहूनी जगतो...
अवघे रंग भरून डोळी
भूलभूलय्यातुन निखरत
इंद्रधणुचे अनेक रंग हे
भरूनी घे मना जीवनात...
