सौभाग्याचे लेणे
सौभाग्याचे लेणे
सौभाग्याचे लेणे हे,
तीचेच असते ।
लेण्याने ती किती,
खुलुन दिसते ।
प्रत्येक लेण्याची,
एक वेगळी गोष्ट असते ।
प्रत्येक लेणे हे ,
तीचे जीवाभावाचे असते ।
ते तीला नाही मिळाले,
तर मग ती रुसते ।
आणी मिळाले की,
दीलखुलास हसते ।
पण पाहिले का कधी,
तीचे हे लेणे ,
एका जागेवर ,
कधिच नसते ।
प्रत्येक ठीकानी,
तीच आहे,
हे लेण्यावरुन दीसते।
टीकली कधी नळ,
आरसा,भींतीवर ।
तोरडी कधी डब्यात ।
बांगड्याही रुप बदलतात ।
कधी स्वयंपाक घरात,
कधी बेडरुम मध्ये मीरवतात ।
मंगळसूत्र कधी मधी,
लॉकरची वारी करुन येते ।
केसाची क्लीप नेहमी,
उशीची जागा घेते ।
आंगठीही सतत,
या बोटातून त्या बोटात ।
जोडव्यांचा मात्र,
असतो नेहमी थाट ।
ते नाही चुकत कधी,
आपली वाट ।
आणी जेव्हा ते चुकतात,
आपली वाट ।
तो असतो तीचा,
शेवटचा थाट ।
