STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

सैराट

सैराट

1 min
148

सैराट झाले पोरं

याचा करा रे विचार,

कशाचे मायबाप

अन् कशाचे संस्कार...


बघा कशी, किती

दुनिया बिघडून गेली,

कळेना कशी औलाद

ही जन्माला आली

घडू नये ते घडतंय

इथे लई न्यारं न्यारं...


लाज शरम दिली कशी

साऱ्यांनी सोडून,

गेली कशी एवढी ही

दुनिया बिघडून?

लग्नाआधीच पोर

कशी होते गरोदर...


जिथे तिथे पाहा इथे

पाणी हे मुरतंय

कळेना कसे कोण, किती

घोटाळे करतंय

झाला आहे साराच आता

दिवसाच अंधार...


Rate this content
Log in