सैनिक पत्नी
सैनिक पत्नी
1 min
509
लोक म्हणतात तुम्ही नाही घरी
लढतय म्हणे सिमेवरी
अस कस दिसता मज घरी
भास होतोय का वेड्यापरी
पाहाटे गोड नीजलेल्या
लेकरांच्या गाली
तुमच्या ओठांची छबी
कैसे हो उमटली
भाकरी करत धुंद असताना
वेणीत फुले कोणी माळली
पाण्याने जड झालेली घागर
अलगत डोईवर कोणी मांडली
सायंकाळी हातात हात घेऊन
कोण असते बोलण्यात दंग
तुम्ही नसतांना का मग येतो
चादरीत तुमच्या अत्तराचा गंध
