STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

सायकल

सायकल

1 min
178

जॉन बॉईड यांचा शोध

आहेच खरी दुचाकी मस्त

बिना पेट्रोल खरा वेग

किमंतीतही आहेच स्वस्त ||


वापर सायकलचा असे फार

लहानांपासून थोर सगळे

त्यांची माझी संगत जुळे

वाहनांमध्ये सगळ्यात वेगळे ||


आरोग्याचा होतो फायदा

फुफ्फुसे अधिक कार्यक्षम

मांस पेशी तंदुरुस्त छान

ज्यादा मेद जवळून येतो घाम ||


असे रूपे वेगवेगळी

जशी तुमची असे आवड

बिनगिअरची, पर्यटनाची

चला तर करा निवड ||


लोकडाऊन काळात 

बसेस , ट्रेन सगळेच बंद

स्वार होऊनी सायकलवर

काही अंतराचा प्रवास सुखद ||


Rate this content
Log in