STORYMIRROR

AnjalI Butley

Children Stories

3  

AnjalI Butley

Children Stories

सायकल वारी पंढरीची

सायकल वारी पंढरीची

1 min
510

पावसाळा सुरू झाला

वेध लागले सायकल वारी पंढरीची करण्यास


आपल्याबरोबर छोट्यालाही घेऊन जाऊ सोबत

होईल त्याच्या नावावर २-३ पुरस्कार खास


सराव खूप केला आहे

मानकरी ह्यावेळी होईल तोच


आला तो दिवस 

उत्साहात सुरू झाली वारी


अतिउत्साहाच्या भरात 

विसरून गेला छोटा


सायकल आपण चालवत आहो

रहदारीच्या नॅशनल हायवे वर


सामना होईल आपला 

वेगवान ट्रकसोबत


काही कळायच्या आत

छोट्याचा होत्याचा नव्हता झाला


मग सुरू झाली धावपळ सर्वांची

पुढच्या वर्षी वयाची अट घालायची


छोट्यांना सायकल वारीला न घेऊन जाण्याचे

सायकल वारीच्या मार्गातील रस्त्यावर योग्य नियोजन करण्याचा


सागणे एकच आहे आता

सायकल वारी करताना 

नका करू चढाओढ

अंतरी वास असू द्या पांडुरंगाचा...


Rate this content
Log in