STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

सावली

सावली

1 min
95

शाळेत जाताना नुसती

दुडक्या चालीत जायची

पिशवी खांद्यावर घ्यायची

वाटेत फुलांची टेहळणी करायची....


सकाळच्या सावलीत खेळावे

आनंदाने तिलाच पकडावे 

हाती तर लागतच नाही कधी

ते क्षण मनात साठून ठेवावेत....


दुपारी शाळेतून घरी जाताना

सावलीचा लपंडाव चालायचा

कुठे गेली माझीच छाया सावळी

ती शोधताना मनी आनंद व्हायचा...


संध्यासमयी शांत शांत लपाछपी

छाया नाही काही नाही सारे शांत

पण सावलीची इतकी सय येते 

मन मात्र होई छायेसाठी अशांत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन