STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

सावली

सावली

1 min
67

झाड बाई झाड ग झाड ग

वडाचे झाड बघ ग बघ ग

झाड मोठे डेरेदार छान ग

पाने त्याची हिरवीगार छान ग...


वडाचे झाड मोठे अन डेरेदार

झाड देते सर्वांना गार सावली

आडोसा झाडाचा घेवून मग

सावलीला उभी राहते माऊली....


पारंब्या वडाच्या झाडाला 

मुलं खेळती वडाच्या दाढीला

मुले लांब लांब झोके घेती 

आनंद अन हर्षात खेळायला...


झाडाला बांधला गोल पार

गप्पाटप्पा मनसोक्त मारती

एकत्र येवून पारावर बसती

मनमोकळे मित्रांजवळ करती.....


झाडावर पाखरे अनेक येती

मुलेबाळे लपाछपी खेळती

झाडावर चिऊताई घरटे बांधते

पिलांना सुरक्षित घरट्यात ठेवती....


साहित्याला गुण द्या
लॉग इन