सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी आम्ही
नाही कुणाची ही भीती
सोसले खूप आजपर्यंत
सांगू मी ते किती किती
नव्हते आम्हांला स्वातंत्र्य
सांभाळा चूल नि मूल
शिक्षणाचे नावच नव्हते
बांधली होती गळ्यात झूल
अडगळीला पडलेली होती
नव्हते घरीदारी काही भाव
अबला होत्या आम्ही म्हणून
सगळ्याना आमचीच हाव
पण माझ्या जीवनी झाली
एक अनोखी अशी क्रांती
सावित्रीबाईने फुलविली
आम्हांत शिक्षणाची ज्योती
शिकले सावरले अन् हुशार झाले
शिक्षणाने अनेक शिखरं मिळवली
घराबाहेर पडून सर्वांच्या बरोबरीने
आज पहा नोकरी करू लागली
सावित्री आमची लाडाची आई
सावित्री साऱ्या महिलांची दाई
तिनेच केला आम्हांत कायापालट
कशी होऊ सावित्रीची उतराई
