साथीदार
साथीदार
1 min
256
आपली सहचारिणी सोबत असेल तर
भरपूर आयुष्य जगू शकतो
किती ही त्रास होवो
ती एकटीच असते सहन करणारी
अनेक नाती आहेत आपल्याभोवती
पण कोणी सहन करत नाही तिच्याएवढं
ती साथ सोडून गेली अचानक
तो आत्मविश्वास गमावून बसतो
कोणी नाही माझ्या सोबतीला
याच विचारात चिंता करत राहतो
एक वर्षाच्या आत तो देखील
तिच्यामागे परलोकात जातो
म्हणून एकमेकांची घ्यावी काळजी
जोपर्यंत दोघांची साथ आहे.
