साताजन्माची झुंड...
साताजन्माची झुंड...

1 min

11.5K
शुभ मंगल सावधान ऐकताच
अंगावर येतात इंचभर शहारे
का कुणास ठाऊक लग्न बेडीत
अडकवतात गाऊन गाणे, प्रीत रे
नटून, थटून सज्ज देण्यास बळी
म्हणे जगण्याची हीच आहे रे रीत
अस्तित्वाच्या फेऱ्यांचे मनी प्रश्न
खरंच का यातच आहे खरे हित
विधींचे ते वेळखाऊ पाठ प्रपंच
किती जीवघेणे अग्निदाहाचे कुंड
वेगवेगळ्या स्वभाव गाठींची वेडी
सातजन्मासाठी लावून देतात झुंड