सात मे
सात मे
1 min
12.2K
 पाचव्या दिवसाची सुप्रभात...!
पा वलो पावली
च राचरात बाबांनो
व्या दि उत्सुक कोरोना
दि सतो....
व टवट ऐकून
सा रा उत्साहच
चि डचिडीने माझा
सु गावा न लागताच जातो....
प्र सन्न चित्ते
भा ग्य रेखावे म्हणता
त डफड जीवाची
हा कोरोना करतो...
उगाचच सकाळी सकाळी
प्रसार माध्यमात डोकावून
भीती फुकाची
नित्य दावतो....
म्हणूनच आता
टीव्ही न पाहण्याचाच
मी संकल्प करतो
आणि
मोकळा श्वास प्राणायामाने
आनंदात घेतो....!