सासरी जाताना
सासरी जाताना
डबडबलेल्या डोळ्यांनी क्षणभर
वळून पहाते पुन्हा चालताना
का ? पाठवतेस सासरी मजला
काय केला मी गुन्हा जगताना
आसवांचा झरा पाहिला
बाबाच्या गालावर ओघळताना
चिमटीत सारे जपून ठेवले
मायापाशाचा बांध फुटताना
आठवतो सदा सुरेख सोहळा
माहेरचे धुंद सूर चुकवताना
काढून समजूत माझी भाबडी
पाहिले दादास कोपऱ्यात रडताना
ओवाळून टाकते जीव स्वतःचा
काय होईल तिला सोडून जाताना ?
बहिणीची वेडी माया पुरते
सासरचा उंबरा ओलांडताना
महापूर येतो तेव्हा तेव्हा
आठवांचा क्षण उलगडताना
शब्द तोकडे पडतात आई
हृदय बोलले निरोप घेताना
मोरपीस फिरतात तनूवर
आठवणींच्या कळ्या फुलताना
जातो उंच माझा झोका
सोनेरी क्षणात झुलताना
