सारे लावतील दिवे
सारे लावतील दिवे
सारे लावतील दिवे
दिव्याखाली असणार काय?
डोक्यात ही अंधार
कुणाला सांगावं काय..
अंधारच झाला सगळीकडे
घडू नये तेच घडे,
सारे झालेत वेडे
म्हणे दिवे लावा गडे.
कोरोनाचा हाहाकार
आणि आम्ही दिवे लावणार
खरं सांगा गडे
कोणता देव पावणार.
दिवा लावायचा देवाला
देवळे झाली बंद,
कोरोना पसरला जगभर
कसला आला आनंद..
वेळ आहे वाईट
काय जादू होणार,
नाटकं करुन सांगा
कोरोना कसा जाणार..
लई घडतंय न्यारं
दिवसा झाला अंधार,
विज्ञानापुढे गेला माणूस
डोके झालेत भंगार.
कोरोनाने घेरलंय रे
अजुन काय हवे,
जीवन नाही हातात
किती लावणार दिवे.?
ज्याला कळतंय लई
त्यानेच लावावा दिवा,
डोक्यातला ही अंधार
दूर कर देवा..