सांजवेळी ह्या
सांजवेळी ह्या
1 min
11.5K
अशा ह्या सांजवेळी
आहे मी निःशब्द
आसमंत हा सारा
क्षितिजावरी कुशीत निजला
भास्करा तुज निजवातांना
वारा गाई झुळमुळ गाणी
चकाकणारी चांदणी
बघ तुज वळून पाही
अशाच ह्या सांजवेळी
पणती लावी नतमस्तकी
मंद प्रकाशात दिपही जळे
कुठेतरी दूरवर
एकू येते घंटानाद
आस लागे मना ही
एकू येई साद मनी