सांजबाला
सांजबाला
1 min
309
"भास्कर" "सांज" भेटीस आला
सांज नव्हे ती "यौवन बाला"
बसे पितकेशरी "वसने" लेऊन
पाहुनी किनारा "अवखळ" झाला
"संथ" जळी "तरंग" उठती
तरंग नव्हे रंगली "सांजलीला"
"रूप" तिचे "कृष्ण धवल"
"भाळी बट" कौतुके "अनिल" आला
"नासिका" नच कोमल "चाफेकळी"
"ओष्ठ". भासे "पंकज" मृदू "पाकळी"
"श्यामल काया" रसरसलेली
काया नच नभीची "रात कळी"
"अस्ताचलगामी"......."सांजसवे"
"सांजास्त" नव्हे ही "स्वप्न" रंगसंगती
छननन छननन "पैंजण" वाजती
पैंजण कैसे "रातकिड्यांची" साथसंगती
"भ्रमर" गुंतला "सरोजासवे"
सरोज नव्हे "मधुर" स्वप्न नवे
पहाटेस निजल्या "रातकळ्या"
घेण्या "भरारी" नवं "विचारांचे" थवे