STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना

सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना

1 min
255

बसले होते विचारात

कशी झाली माझी अवस्था

मनाची ही अस्वस्थता 

सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना

    डोळ्यात होते अश्रू माझ्या

    दाखवू मी कोणा आता

     घालमेल होते जीवाची माझ्या

     सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना

मनात काय होतं माझ्या

कोणाशी मी बोलू आता

मनातील ह्या विचारांनी हैराण केलं जगणं माझं

सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना

     जगायचं मी सोडून दिलं

     भावनांचा खेळ मध्ये आला

     त्रासदायी होतो जीव माझा

     सांगू मी कोणा आता जीवाची ही दैना


साहित्याला गुण द्या
लॉग इन