STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सांगू कसं प्रिये

सांगू कसं प्रिये

1 min
454

बोललास तू माझ्याशी समजले मला सर्वकाही

बोलताना तुझ्याशी हृदयात माझ्या धडधडी भरली


काय बोलू कसं बोलू उमगे न मला काहीही

कशी प्रेमात पडले तुझ्या कळले मला न काही


सांगू कसे प्रिया मी शब्द माझ्याजवळ नाही

समजून मजला घे ना बोलवत मजला नाही


डोळ्यात माझ्या बघून समजून तू घेशील

प्रेम तुझ्यावर करते मी कळले तुला असेल


Rate this content
Log in