Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

सामर्थ्य लेखणीचे

सामर्थ्य लेखणीचे

1 min
11.7K


प्रभावशाली सामर्थ्य लेखणीचे

बहारदार शब्दांतून साकारते

मनातील विचार उमटल्यावर

लेखकाची प्रतिभा अवतरते   १


थोर लेखकांचे विनोदी अंगाचे लेखन

सर्वांनाच नेहमी प्रफुल्लित करते

लेखकाची प्रगल्भता,प्रसिद्धी, सन्मार्गाने

साहित्य cयशोशिखरावर चढते २


पत्रकारांच्या लेखणीच्या सामर्थ्याने

मस्त ताशेरे ओढले जातात राजकारणावर

खरा समर्पक दम असतो त्यांच्या लिहिण्यात

म्हणूनच तर फरक पडतो समाजावर ३


बोलून जे जमत नाही ते लिहून जमते

मग कधी कधी लेखणी हत्यारही ठरते

ती कधी मनातील भाव कागदावर उमटवते

कधी धारदार शब्दांनी अपमानित करते 


Rate this content
Log in