सामोपचार !!
सामोपचार !!
1 min
323
शब्दाने शब्द वाढत जातो ,
वाढत जाते भांडण ....
वाद जातो विकोपाला ,
वाढत जाते आक्रंदन !!
साध्य काही होत नाही ,
येते फक्त कटुता ......
नातं जातं संपून , अन्
येते फक्त वितुष्ठता !!
नाही धरावा आकस मनात ?
मिटवून टाकावा वाद ....
सामोपचाराने माणूस जपावा ,
द्यावी प्रेमळ साद !!