सामाजीक विषय।
सामाजीक विषय।
1 min
259
सामाजिक विषयाचे भान असते थोडे,
तर राजकारणाचे आम्हीही घेतले असते धडे।
भांडलो नसतो उगाच मत देवून,
खुर्चीसाठी आम्हीही लावले असते धागेदोरे।
सामाजिक विषयाचे घेतले असते सुत्रे,
भावबंधिलकीची जपले असते गोत्रे,
नसते भांडले कुणी जातीवरून,
सगळेच माणूस सारखे उघडली असती नेत्रे।
किती समस्यांनी घेरले सामाजिक विषयाला,
कुणी भुकमरीचा बळी ठरला,
होवून भ्रष्टाचारी
कुणी गुंडागरीचा डोस प्याला।
सामाजिक विषयाचे भान असते थोडे
तर राजकारणाचे आम्हीही घेतले असते धडे |
